Monday, December 14, 2020

Marathi Horror Katha - पाखरू 

Marathi Horror Kath 

 विकी , पिंकी, मनू ,पंक्या , मोना १२ वि झाल्या नंतर हे सर्व जण जेव्हा सिनियर कॉलेज ला गेले तेव्हा यांची झाली ओळख म्हणजे थोड्याच दिवसात यांचा एक चांगला ग्रुप बनला. म्हणजे सगळ्यांचे स्वभाव पण जुळत होते सर्वच जण हॉस्टेल ला होते त्यामुळं दिवसा मधील १४-१५ तास तरी हे सगळे सोबतच होते . चहा ,नाश्ता ,जेवण सर्व सोबतच. कॉलेज मधील कोणता इव्हेंट असला , कोणता डे सेलेब्रेशन असेल तर ह्या ५ जणांची थिम सगळ्यात उठून दिसायची . म्हणजे आता यांची चांगली गट्टी जमली होती . हे कॉलेज मैत्री आता कॉलेज पूर्ती नव्हती राहिली . ते प्रत्येक सेमिस्टर  झाल्या नंतर एका एका च्या घरी जात होते ३-४ दिवस राहत होते मज्या मस्ती करत होते . प्रत्येकाच्या गावात असं काहीतरी वेगळेपण नक्कीच होत जे दुसऱ्या गावी नव्हतं . आणि ते सर्व जण आपलुकींन त्या ठिकाणी जाऊन मज्या करायचे आठवणी साठवून ठेवायचे . असंच जेव्हा पिंकी च्या गावी गेले तेव्हा तिथलं तेंच्या शेतातली जांभळीच्या झाडावरची खालेली जांभळे त्यांना खूप दिवस आठवत होती .आणखी जेव्हा विकी च्या घरी गेलेले तेव्हा तिथं जनावरांच्या शर्यती पाहण्यात त्यांनी  खूप मज्या घेतली होती . पंक्या च्या घरी गेलती तेव्हा तिथल्या त्याच्या गावाच्या नदीच्या घाटावरील बागेत गेलेलीत भेळ वगैरे खाऊन मज्या करून बोलत बसले तोच त्यांना कोणाची तरी धन द्याला आलेली लोक दिसले हे मुलं कुणाचे ना कुणाच्या तरी गेलेलेच असतात पण पिंकी आणि मोना पहिल्यांदाच बगत होते . 

        तोच पंक्या म्हंटलं आमच्या इथं जेव्हा जेव्हा धन दिली जाते तेव्हा तेव्हा त्या धन दिलेल्या धुरातून जेव्हा एखादा पक्ष्यांचा थवा जातो तेव्हा त्यातील एक पक्षी जेव्हा ते धुराच्या पलीकडे गेलेलं असतात . अशी हि गोष्ट सगळ्यांचाच चांगलीच लक्ष्यात राहिलेली असते .

        बरेच दिवस जातात कॉलेज होत प्रत्येक जण आपल्या कामात वस्त असतो . तोच मनू सगळयांना फोन करून सांगतो कि पंक्या ने त्याच्या गावी आपल्या सर्वाना आज भेटण्यासाठी बोलवलं आहे . आणि गावाच्या घाटावरती येऊन थांबा असा निरोप आहे असं सगळ्यांना मनू सांगतो आणि सगळे यायला तयार पण होतात कारण खूप दिवस जुने कॉलेज मित्रांना भेटण्याची ओढ सगळ्याच असते . सगळेच जण वेळेत पोहचले जुन्या आठवणी ताज्या करू लागले प्रत्येकाच्या गावी जाऊन केलेली धम्माल त्यांना आठवत होती . बराच वेळ झाला पण पंक्या काही आला नव्हता . सगळेच जण मनू ला मागे लागले अरे आपण एवढ्या लांबून आलो सगळी इकडे हा गावातच असून अजून कसा नाही आला. नक्की असं करतोय तरी काय कि आपल्याला बोलून स्वतः कामामध्ये अडकून पडलाय. तोच मनू म्हंटलं अरे त्यानं लाईव्ह लोकेशन पाठवलंय यायचाय अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हंटला यायलय. बरं म्हंणत  परत एकदा सगळे बोलण्यात मग्न झाले. 

                तोवर पिंकी ला घाटावरती कोणाला तरी धन द्याला आणलं जात आहे हे दिसलं तिने हे बोलताच सगळ्यांना त्या पक्ष्यांची कथा आठवली पंक्या म्हंटला ते खरेच आहेका आज बघुयात असं म्हणत . अरे पंक्या अजून कुठं अडकून बसलाय असं विकी म्हंटला तोच मनू म्हंटलं हि लोक पंक्या लाच धन द्याला आले आहेत तेवढ्यात विकी न मनू च्या कानाखाली वाजून काय बोलतोयस समजतंय का तुला ? फालतू बोलायला जमलो नाही आपणं . तसेच मनू गुडग्या वरती पडला आणि ढसा ढसा रडू लागला . सगळ्यांना जोरात धक्का असला होता . विकी न लावलेल्या कानाखालील आवाज अजून सगळ्यांच्या कानात वाजत होता . सगळेच जण मनू जवळ येऊन ये मन्य  मस्करी करत अशील तर बंद कर पण मनू  सांगितलं अरे मी खरे सांगतोय . पंक्या च्या भावाचा मला फोन आलेला . असं झालं आहे आणी आपण सर्व या ठिकाणी असावं हीच त्याची शेवटची इच्या होती . सगळ्याना धुरातून कमी झालेला पक्षी बघायचा होता . पण नियतीनं या मैत्रीच्या थव्याचे पंख कापले होते .  


No comments:

Post a Comment

भीती एक अनुभव Horror Story Marathi

  भीती एक अनुभव  Horror Story Marathi हा अनुभव त्याच्या शब्दांतून.               शाळेला सुट्ट्या लागल्या आणि मी माझ्या आई सोबत मामाच्या गावा...