Monday, December 14, 2020

भीती एक अनुभव Horror Story Marathi

 

भीती एक अनुभव Horror Story Marathi

हा अनुभव त्याच्या शब्दांतून.


              शाळेला सुट्ट्या लागल्या आणि मी माझ्या आई सोबत मामाच्या गावाला आलो होतो.  मामाचा गाव म्हणजे डोंगर-दऱ्या छोटसं गाव तिथे जास्तीत जास्त 30 ते 40 घरात असतील.  आणि त्यात आमचं घर म्हणजे गावाच्या एका कोपऱ्यात घराच्या आजूबाजूला मोठमोठी झाडं आणि घराच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल होतं .  मी माझ्या मामाचा लाडका होतो आणि मामाच्या गावाला माझे चांगले मित्र पण होते सागर आणि आकाश.  या दिवशी गावाच्या मंदिरात मोठा कार्यक्रम होता . मी माझ्या आई ,मामा, मामी आणि माझा लहान भाऊ संध्याकाळी सात वाजता मंदिरात जाण्यासाठी निघालो . तिथे माझे मित्र आकाश आणि सागर . होते कार्यक्रम सुरू होणार होता की तेवढ्यात माझा लहान भाऊ दीपक च्या पोटामध्ये दुखू लागलं आणि त्यामुळे आई आणि मामी दिपकला घेउन घरी गेले .


            कार्यक्रम सुरू होऊन एक तास झाला होता.  आणि गावातील जेष्ठ व्यक्ती रामभाऊ हे आपले मनोगत व्यक्त करत होते . माझे मामा  त्यांच्या मित्रांसोबत कार्यक्रम बघण्यात मग्न झाले होते . पण आम्ही तिघे मित्र कंटाळलो होतो.  आम्हाला घरी जायचं होतं पण मामा मुळे आम्ही थोडावेळ थांबलो . शेवटी मी मामाला घरी जाण्याचा इशारा केला.  तेव्हा मी मामाला म्हणलो की आम्ही तिघे जातो .  तुम्ही नंतर कार्यक्रम संपल्यावर मित्रांसोबत या . मामाने परवानगी दिली आणि मित्रांजवळ जाऊन बसले . आता आम्ही तिघे मित्र घरी जाण्यास निघालो रात्रीचा अंधार होता . त्यावेळेस साडेनऊ ते दहा वाजले असतील.   आणि आम्ही तिघेजण गप्पा मारत चाललो होतो . आणि मध्येच आकाश ने पाटलाच्या म्हातारीचा विषय काढला.  ते या गावातले असल्यामुळे त्यांना  ही गोष्ट माहीत होती.  पण मला माहित नव्हती  मग मी आकाश ला  विचारलं की काय झालं होतं ? पण सागर खुप घाबरत होता शेवटी सागरचा नकार असतानाही आकाशने सांगायला सुरुवात केली . की गावाच्या  नामवंत माणूस गजानन पाटील यांच्या आईला सगळेजण पाटलांची म्हातारी म्हणून ओळख होती . पाटील गावासहीत आपल्या आईलाही खूप त्रास द्यायचा.  त्याने जमिनीसाठी त्यांना स्वतःच्या भावाचा खून केला होता . आणि त्याच्या त्रासाला कंटाळून पाटलांच्या म्हातारीनं गावाच्या बाहेरील चिंचेच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली होती.


     त्यानंतर तिच्या मुलाचा ही मृत्यू झाला.  या गोष्टीला साधारण चाळीस वर्षे झाली असतील, पण तरीही गावकर्‍यांचे म्हणणे आहे की पाटलांचे म्हातारी अजूनही त्याच झाडाखाली असते . आणि बऱ्याच लोकांना दिसली पण आहे . हे ऐकून माझ्या मनात भीती निर्माण झाली . आणि मी घाबरलो आणि आम्हाला  समोर रस्त्याच्या कडेला एक मोठे चिंचेचे झाड दिसलं . आणि हे ते झाड आहे याची आठवण सागरने करून दिली.   सर्वत्र अंधार पसरला होता आणि  गार वाऱ्याने  झाडांचा हल्ल्याचा आवाज येत होता.  त्यामुळे आमच्या अंगावर काटा आला . काय करावे काही नाही काहीच सुचत नव्हते.  शेवटी आम्ही एक एकमेकांचे हात पकडून जोराने पळत सुटलो .  पळता पळता असं वाटत होतं की कोणी आपल्याला मागून बघत आहे.  पण भीतीने मागे वळून बघण्याची हिम्मत सुद्धा नव्हती . पळता पळता  दहा मिनिटे झाली असतील . त्यानंतर आम्ही थांबलो सागर तर रडत होता . आम्ही मागे बघितलं .. तर त्या चिंचेच्या झाडाजवळ आम्हाला कोणी तरी असल्या सारखं दिसलं तरी म्हातारी होती वाटतं .  आणि त्या दिशेने जोरात हसण्याचा आवाज येत होता ,आम्ही त्या झाडाकडे बघत होतो . तिकडून जोराचा आवाज झाला आज वाचला पण मी तुम्हाला सोडायची नाही.  बघेल एक एकाला त्यानंतर आम्ही तेथून धावा ठोकला .


घरी पोहोचलो मला तर कळत पण नव्हते की हे सत्य आहे म्हणून . दुसऱ्या दिवशी तिघांच्या अंगात जोराचा ताप होता . या गोष्टीत सत्य -असत्य किती हे माहीत नाही.  पण याच गोष्टीला जर वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर पाटलाच्या म्हातारीने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली.  आणि आसपासच्या प्रसंगाने त्यांना झालेला एक भास .  

Marathi Horror Katha - पाखरू 

Marathi Horror Kath 

 विकी , पिंकी, मनू ,पंक्या , मोना १२ वि झाल्या नंतर हे सर्व जण जेव्हा सिनियर कॉलेज ला गेले तेव्हा यांची झाली ओळख म्हणजे थोड्याच दिवसात यांचा एक चांगला ग्रुप बनला. म्हणजे सगळ्यांचे स्वभाव पण जुळत होते सर्वच जण हॉस्टेल ला होते त्यामुळं दिवसा मधील १४-१५ तास तरी हे सगळे सोबतच होते . चहा ,नाश्ता ,जेवण सर्व सोबतच. कॉलेज मधील कोणता इव्हेंट असला , कोणता डे सेलेब्रेशन असेल तर ह्या ५ जणांची थिम सगळ्यात उठून दिसायची . म्हणजे आता यांची चांगली गट्टी जमली होती . हे कॉलेज मैत्री आता कॉलेज पूर्ती नव्हती राहिली . ते प्रत्येक सेमिस्टर  झाल्या नंतर एका एका च्या घरी जात होते ३-४ दिवस राहत होते मज्या मस्ती करत होते . प्रत्येकाच्या गावात असं काहीतरी वेगळेपण नक्कीच होत जे दुसऱ्या गावी नव्हतं . आणि ते सर्व जण आपलुकींन त्या ठिकाणी जाऊन मज्या करायचे आठवणी साठवून ठेवायचे . असंच जेव्हा पिंकी च्या गावी गेले तेव्हा तिथलं तेंच्या शेतातली जांभळीच्या झाडावरची खालेली जांभळे त्यांना खूप दिवस आठवत होती .आणखी जेव्हा विकी च्या घरी गेलेले तेव्हा तिथं जनावरांच्या शर्यती पाहण्यात त्यांनी  खूप मज्या घेतली होती . पंक्या च्या घरी गेलती तेव्हा तिथल्या त्याच्या गावाच्या नदीच्या घाटावरील बागेत गेलेलीत भेळ वगैरे खाऊन मज्या करून बोलत बसले तोच त्यांना कोणाची तरी धन द्याला आलेली लोक दिसले हे मुलं कुणाचे ना कुणाच्या तरी गेलेलेच असतात पण पिंकी आणि मोना पहिल्यांदाच बगत होते . 

        तोच पंक्या म्हंटलं आमच्या इथं जेव्हा जेव्हा धन दिली जाते तेव्हा तेव्हा त्या धन दिलेल्या धुरातून जेव्हा एखादा पक्ष्यांचा थवा जातो तेव्हा त्यातील एक पक्षी जेव्हा ते धुराच्या पलीकडे गेलेलं असतात . अशी हि गोष्ट सगळ्यांचाच चांगलीच लक्ष्यात राहिलेली असते .

        बरेच दिवस जातात कॉलेज होत प्रत्येक जण आपल्या कामात वस्त असतो . तोच मनू सगळयांना फोन करून सांगतो कि पंक्या ने त्याच्या गावी आपल्या सर्वाना आज भेटण्यासाठी बोलवलं आहे . आणि गावाच्या घाटावरती येऊन थांबा असा निरोप आहे असं सगळ्यांना मनू सांगतो आणि सगळे यायला तयार पण होतात कारण खूप दिवस जुने कॉलेज मित्रांना भेटण्याची ओढ सगळ्याच असते . सगळेच जण वेळेत पोहचले जुन्या आठवणी ताज्या करू लागले प्रत्येकाच्या गावी जाऊन केलेली धम्माल त्यांना आठवत होती . बराच वेळ झाला पण पंक्या काही आला नव्हता . सगळेच जण मनू ला मागे लागले अरे आपण एवढ्या लांबून आलो सगळी इकडे हा गावातच असून अजून कसा नाही आला. नक्की असं करतोय तरी काय कि आपल्याला बोलून स्वतः कामामध्ये अडकून पडलाय. तोच मनू म्हंटलं अरे त्यानं लाईव्ह लोकेशन पाठवलंय यायचाय अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हंटला यायलय. बरं म्हंणत  परत एकदा सगळे बोलण्यात मग्न झाले. 

                तोवर पिंकी ला घाटावरती कोणाला तरी धन द्याला आणलं जात आहे हे दिसलं तिने हे बोलताच सगळ्यांना त्या पक्ष्यांची कथा आठवली पंक्या म्हंटला ते खरेच आहेका आज बघुयात असं म्हणत . अरे पंक्या अजून कुठं अडकून बसलाय असं विकी म्हंटला तोच मनू म्हंटलं हि लोक पंक्या लाच धन द्याला आले आहेत तेवढ्यात विकी न मनू च्या कानाखाली वाजून काय बोलतोयस समजतंय का तुला ? फालतू बोलायला जमलो नाही आपणं . तसेच मनू गुडग्या वरती पडला आणि ढसा ढसा रडू लागला . सगळ्यांना जोरात धक्का असला होता . विकी न लावलेल्या कानाखालील आवाज अजून सगळ्यांच्या कानात वाजत होता . सगळेच जण मनू जवळ येऊन ये मन्य  मस्करी करत अशील तर बंद कर पण मनू  सांगितलं अरे मी खरे सांगतोय . पंक्या च्या भावाचा मला फोन आलेला . असं झालं आहे आणी आपण सर्व या ठिकाणी असावं हीच त्याची शेवटची इच्या होती . सगळ्याना धुरातून कमी झालेला पक्षी बघायचा होता . पण नियतीनं या मैत्रीच्या थव्याचे पंख कापले होते .  


भीती एक अनुभव Horror Story Marathi

  भीती एक अनुभव  Horror Story Marathi हा अनुभव त्याच्या शब्दांतून.               शाळेला सुट्ट्या लागल्या आणि मी माझ्या आई सोबत मामाच्या गावा...