भीती एक अनुभव Horror Story Marathi
हा अनुभव त्याच्या शब्दांतून.
शाळेला सुट्ट्या लागल्या आणि मी माझ्या आई सोबत मामाच्या गावाला आलो होतो. मामाचा गाव म्हणजे डोंगर-दऱ्या छोटसं गाव तिथे जास्तीत जास्त 30 ते 40 घरात असतील. आणि त्यात आमचं घर म्हणजे गावाच्या एका कोपऱ्यात घराच्या आजूबाजूला मोठमोठी झाडं आणि घराच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल होतं . मी माझ्या मामाचा लाडका होतो आणि मामाच्या गावाला माझे चांगले मित्र पण होते सागर आणि आकाश. या दिवशी गावाच्या मंदिरात मोठा कार्यक्रम होता . मी माझ्या आई ,मामा, मामी आणि माझा लहान भाऊ संध्याकाळी सात वाजता मंदिरात जाण्यासाठी निघालो . तिथे माझे मित्र आकाश आणि सागर . होते कार्यक्रम सुरू होणार होता की तेवढ्यात माझा लहान भाऊ दीपक च्या पोटामध्ये दुखू लागलं आणि त्यामुळे आई आणि मामी दिपकला घेउन घरी गेले .
कार्यक्रम सुरू होऊन एक तास झाला होता. आणि गावातील जेष्ठ व्यक्ती रामभाऊ हे आपले मनोगत व्यक्त करत होते . माझे मामा त्यांच्या मित्रांसोबत कार्यक्रम बघण्यात मग्न झाले होते . पण आम्ही तिघे मित्र कंटाळलो होतो. आम्हाला घरी जायचं होतं पण मामा मुळे आम्ही थोडावेळ थांबलो . शेवटी मी मामाला घरी जाण्याचा इशारा केला. तेव्हा मी मामाला म्हणलो की आम्ही तिघे जातो . तुम्ही नंतर कार्यक्रम संपल्यावर मित्रांसोबत या . मामाने परवानगी दिली आणि मित्रांजवळ जाऊन बसले . आता आम्ही तिघे मित्र घरी जाण्यास निघालो रात्रीचा अंधार होता . त्यावेळेस साडेनऊ ते दहा वाजले असतील. आणि आम्ही तिघेजण गप्पा मारत चाललो होतो . आणि मध्येच आकाश ने पाटलाच्या म्हातारीचा विषय काढला. ते या गावातले असल्यामुळे त्यांना ही गोष्ट माहीत होती. पण मला माहित नव्हती मग मी आकाश ला विचारलं की काय झालं होतं ? पण सागर खुप घाबरत होता शेवटी सागरचा नकार असतानाही आकाशने सांगायला सुरुवात केली . की गावाच्या नामवंत माणूस गजानन पाटील यांच्या आईला सगळेजण पाटलांची म्हातारी म्हणून ओळख होती . पाटील गावासहीत आपल्या आईलाही खूप त्रास द्यायचा. त्याने जमिनीसाठी त्यांना स्वतःच्या भावाचा खून केला होता . आणि त्याच्या त्रासाला कंटाळून पाटलांच्या म्हातारीनं गावाच्या बाहेरील चिंचेच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली होती.
त्यानंतर तिच्या मुलाचा ही मृत्यू झाला. या गोष्टीला साधारण चाळीस वर्षे झाली असतील, पण तरीही गावकर्यांचे म्हणणे आहे की पाटलांचे म्हातारी अजूनही त्याच झाडाखाली असते . आणि बऱ्याच लोकांना दिसली पण आहे . हे ऐकून माझ्या मनात भीती निर्माण झाली . आणि मी घाबरलो आणि आम्हाला समोर रस्त्याच्या कडेला एक मोठे चिंचेचे झाड दिसलं . आणि हे ते झाड आहे याची आठवण सागरने करून दिली. सर्वत्र अंधार पसरला होता आणि गार वाऱ्याने झाडांचा हल्ल्याचा आवाज येत होता. त्यामुळे आमच्या अंगावर काटा आला . काय करावे काही नाही काहीच सुचत नव्हते. शेवटी आम्ही एक एकमेकांचे हात पकडून जोराने पळत सुटलो . पळता पळता असं वाटत होतं की कोणी आपल्याला मागून बघत आहे. पण भीतीने मागे वळून बघण्याची हिम्मत सुद्धा नव्हती . पळता पळता दहा मिनिटे झाली असतील . त्यानंतर आम्ही थांबलो सागर तर रडत होता . आम्ही मागे बघितलं .. तर त्या चिंचेच्या झाडाजवळ आम्हाला कोणी तरी असल्या सारखं दिसलं तरी म्हातारी होती वाटतं . आणि त्या दिशेने जोरात हसण्याचा आवाज येत होता ,आम्ही त्या झाडाकडे बघत होतो . तिकडून जोराचा आवाज झाला आज वाचला पण मी तुम्हाला सोडायची नाही. बघेल एक एकाला त्यानंतर आम्ही तेथून धावा ठोकला .
घरी पोहोचलो मला तर कळत पण नव्हते की हे सत्य आहे म्हणून . दुसऱ्या दिवशी तिघांच्या अंगात जोराचा ताप होता . या गोष्टीत सत्य -असत्य किती हे माहीत नाही. पण याच गोष्टीला जर वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर पाटलाच्या म्हातारीने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. आणि आसपासच्या प्रसंगाने त्यांना झालेला एक भास .
No comments:
Post a Comment